शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये उदयनराजेंचं स्वागतच : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:27 IST

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबत आमदारांच्या विरोधानंतर अनेक तर्क-वितर्क लढविले जात ...

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबत आमदारांच्या विरोधानंतर अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या संपर्कात असल्याचीही चर्चा होती. याबाबत एका वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी जागा आहे, असे वाटत नाही. ते जर भाजपमध्ये येण्यास उत्सुक असतील तर त्यांचे स्वागतच असेल, त्यांना नकार देण्याचा प्रश्नच नाही,’ असे प्रत्युत्तर यांनी दिले.भाजपने पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजघराण्यातील व्यक्तींना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू केला आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या आमदारांनीच विरोध केल्यामुळे खासदार उदयनराजेंना उमेदवारी मिळणार किंवा नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. जर खासदार उदयनराजे यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यांना आपल्या पक्षात घेण्यास कोणताही पक्ष उत्सुकच असेल, त्यामुळे ते कोणाकडे जाणार, हे फक्त ते स्वत:च सांगू शकतील, असे मतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. उदयनराजेंना नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत उदयनराजेंसाठी भाजपचे दरवाजे उघडे असल्याचेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. खासदार उदयनराजेंसाठी कोणत्याही पक्षात संधी निर्माण होऊ शकते, याची राष्ट्रवादी काँग्रेसलाही जाणीव असल्यामुळे उमेदवारीबाबत कोणताही निर्णय एवढ्यात घेतला जाणार नाही. अंतिम टप्प्यापर्यंत उमेदवारी कोणाला द्यायची, हे गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.